घनघोर काळोखात, बुडली आज पहाटकोणा कसे न कळले, आली कुठून लाट
तूटले सगे जीवाचे, तूटली सारी नाती
भर दुपारीस मजला, भासे भयान राती
शोधीत फिरते वेडी, चुकले कुठे मी वाट
कोणा कसे न कळले, आली कुठून लाट
डोळ्यात उभी माझ्या, भेडसावीत निशा
विस्कटून गेल्या कुठे, सार्या दाही दिशा
पाउल कुठे माझे, अंधार झाला धनदाट
कोणा कसे न कळले, आली कुठून लाट
शोधू कुठे तुला मी, लपलास कुठे तान्हा
कंठात शोक भारी, उरात फुटला पान्हा
डोळ्यात उसंत नाही, वाहती अश्रुंचे पाट
कोणा कसे न कळले, आली कुठून लाट
नियतीने कसा आज, उधळून टाकला डाव
खवळलेल्या समिंदरात, फुटली माझी नाव
कशी कुणा द्वाडाची, संसारा लागली नाट
कोणा कसे न कळले, आली कुठून लाट
-हरीश दांगट
March 20, 2011
No comments:
Post a Comment