Saturday, March 26, 2011

कुंती

कुंती



किती रखरखाट आहे

बाजार ही बंद...

सगळे कसे कागदाच्या बोळ्यासारखे

गोळा होवून पडलेत..

पडवीत, पायरीवर, ग्यालरीत, गल्लीत

एवढ्या रखरखत्या दुपारी

ती ग्यालरीत उभी आहे

लांबवरल्या उन्हाच्या झळा बघत

शून्य नजर, विस्कटलेले केस

अन फसकटलेली लाली घेवून..

घालमेल तिची अन त्या जीवाची..

छातीवरला पदर बाजूला सारून

ती भूलवतेय वाऱ्याला

झांपराची वरची दोन बटन ही उघडी

पण वारा तिच्याकड ढुंकूनही पाहत नाही

उघड छाताड, फुगीर पोट

आज सूर्यदेव असा का कोपलाय

कुंतीवर..?



-मनोज.......ऑक्टोंबर २०१०

No comments:

Post a Comment