सीमारेषा
चला पक्कं झालं तर..
डोळ्यांना सांगितलं पाहिजे "डोळे बंद कर"
कानांना कानावर हात ही ठेवायला सांगाव.....
झोपेलाही सांगाव "झोप आता निवांत"...
काळरात्रीच्या कुशीत शिरताना मला...
आक्राळ विक्राळ आकृत्यांच भय का वाटावं ?
जिथ रात्रच भेदरलेली असेल तर..
माझ्यावर झालेल्या जखमांना
बघूनच तिची बोबडी वळलीय
ती आकसून बघतेय माझ्याकडे..
अन मी वेडपट या विचारांत की..
माझं आता काय होईल
तू सोडल्यावर कस निखळल्यासारख झालंय
तू तर नुसती सीमारेषाच पार केलीस ...
एक पाऊल टाकलस अन सूर्य झालास..
पण मला काय माहित की..
पहाटेची सीमारेषा जग बदलते ते..
मी त्याच अंधारात अजूनही की तू माझाच म्हणून...
-मनोज .....११/३/२०११
No comments:
Post a Comment