सासुं ज आणि सुना ज
सासू जेथेची आहे सून तेथेची राहावी
भांडणा कारणे नसती ती क्षणात व्हावी
नाते जुने ,गडी नवे ,तिखट मिठाई चूगल्याची
मनी देव्ष,मुखी आदर,चेहरे स्मित राहावी
साडी चोडी, अलंकार आणिक राहणी मान
मुसळ शोधूनी करती एकमेकाचा अपमान
मुलगा,सासरा,नवरा नाम बाहुले घराशी
खेळ चालला त्यांचा,झळ पोहचे यांच्या जीवाशी
पैसा अडका द्रव्य नित यांच्या चरणी लोळावी
बैल घाण्याचे सम्बोधती नरा,आसवे त्यांनी गाळावी
नित राहती सोबती तरी न सोबत लाभलेली
गाडे वोढती शेवटास चाके ती लहान मोठी थांबलेली
इतिहास सांगतो आणिक अशीच पुनरावृत्ती घडावी
सासू सुनेच्या आणिक सून सासूच्या गळा पडावी
-(निलेश)
No comments:
Post a Comment