Saturday, March 26, 2011

गाजली माझी कहाणी (गझल )

.......गाजली माझी कहाणी (गझल ).....





आस वेडी भास वेडे आसवे झाली शहाणी

रात सारी जागलेली आठवांची बोल गाणी



भाव थोडे घाव थोडे बांधले घर वेदनांनी

डाव सारे मोडण्याची रीत त्याची ही पुराणी



मान नाही भान नाही चालले शोधीत वाटा

सोबतीला आज होती वादळांची ती तराणी





प्रीत गेली जीत गेली खेळले ते खेळ सारे

हार झाली ठार माझी संपली रे आज राणी





गाव गेले नाव गेले हासुनी ते साहिले ही

वाजली आत्ताच डंका गाजली माझी कहाणी





-निहारिका ...

दि .१८.०३.२०११

No comments:

Post a Comment