Wednesday, March 30, 2011

एक जीवन जन्मास आल काल

एक जीवन जन्मास आल काल

स्वछ,निरोगी,थंड खोलीत



विकत घेतलेला मोकळा स्वाश घेत

एका मोठ्या रकमेच्या जोरावर ....

अभिमानाने रडत....

एका श्रीमंत देहावर खेळत



एक असच जीवन त्याच वेळेस

जन्मास आल......

तुटलेल्या पायावर उभ्या असलेल्या झोपडीत

फुकटचा,दुषित स्वाश घेत

तोकड्या रकमेत ......



जन्म दोघांचाही एकाच विश्वात

पण घेतल्या जाणार्या श्वासांचे नाव मात्र

गरीब आणि श्रीमंत ,,,,

एक सुरवात जगणारी ......

आणि दुसरा सुरवातीलाच अंत ...



एकाची नाजूक पावले वरचढ

दुसऱ्याची पाऊल ठेवण्यास धडपड



एकाच नसीब पूर्वीच लिहिलेलं

एकाच लिहिण्या पूर्वीच खोडलेल



जगतील ते त्यांच्या स्वतंत्र विश्वात

किवा जगवले जातील .....

शेवटास त्याच्या नेहमीसारखेच उचलले जातील

पण तिथे हि काही खांदे ...

गरीब आणि कुठे श्रीमंत असतील......



......................(निलेश)

No comments:

Post a Comment