Wednesday, March 30, 2011

जीवितांच्या कवितांसाठी

जीवितांच्या कवितांसाठी,शब्दांचा श्वास

शब्दांच्या श्वासात,कवितेचा प्राण

कवितेच्या प्राणात सुरांचा ओंकार

ओंकारध्वनित जीविताचा आभास!!

या आभासातच जीवन रंग असतात

शब्दांना सुरांना नवे रूप देतात

माणसाला दिसतात वाळूतल्या

अस्पष्ट -धूसर शब्द्खुणा

त्यांनाच तो जीवन म्हणतो पुन्हा-पुन्हा

त्या खुणांच्या आभासात जीवन शोधायचे असते

भावनांच्या राखेतून पुनश्च उभे राहायचे

फिनिक्स पक्ष्याप्रमाणे





साधना-------१६--३--११

No comments:

Post a Comment