सासू म्हणे सूनबाई
सासू म्हणे सूनबाई, नाकावरती बघायचे नाही
सून म्हणे सासूबाई, तुमचा जीभेवर ताबा नाही
आली म्हणे नवलाई, थुई थुई थुई नाचते बाई
जुनीच ओरड म्हातारीची, बक बक तिची थांबत नाही
रोज रोज होई भांडन, शब्दांची नुसती कणकण
सासू सूनेच्या युद्धात, नवरोबा-सासोबाची वणवण
नवरोबाची होई आड़-विहीर, सासोबाची गुपचुप चीड
कुणी करावी मध्यस्थी ? भले भलेही जेथे घाबरती
गुपचुप होतो मग समेट, जणू झालेच नाहीत युद्ध अनेक
माय-लेकीच्या नात्यात म्हणे, हवीहवीशी प्रेमळ तू तू मे मे
-चैतन्य...
No comments:
Post a Comment