मेतकुट,गुळपीठ आणी सासू सूना
नातसून आणी आज्जे सासू
यांच्या मधे बिच्चारी सासू
नातसून आज्जेसासुचे मेतकुट
दोन पाटांमधे सासूचा होतो कुट
सासू सुनेचे पटत नाही
सासूचे काही चालत नाही
आज्जी म्हणते सूना वाईटच
नातसून म्हणते सासवा कजागच
सासू गालातच हसत असते
दोघींची गम्मत पहात असते
आज्जी नातसुनेत वाद होत आहे
सासू सून, यात कोण वाईट आहे
सासू, सूनेच्या कानत काही सांगते
आज्जीच्या कानातही काही सांगते
नातसून आज्जेसासूचं मेतकुट संपलं
घरात,दोन सासूसुनांच गुळपीठ जमलं
-रजनी अरणकल्ले २४.३.११
No comments:
Post a Comment