शाळेमधे आज ही धावाधाव का रे?
मोठ्या बाई इतक्या काळजीत का रे?... ॥१॥
शाळा सुरु होण्याआधी गंमत झाली
बसमधे बसून सहल निघाली... ॥२॥
म्हणाल्या बाई लांब फ़िरायला जाऊ
बागेमधे जाऊनी खुप गाणी गाऊ... ॥३॥
इथे नाही बाग ना खेळायला काही
अजूनही कुणाला खाऊ दिला नाही... ॥४॥
नको अशी शाळा आणि नको या बाई
रात्र झाली तरी का आली नाही आई?... ॥५॥
ये ना ग आई नको एकट्याला सोडू
वाटते भीती, आता येईल ग रडू... ॥६॥
- संजीत. २४-३-२०११.
No comments:
Post a Comment