देव ४ !!
दाखवती चेहऱ्यावर , नुसता भक्तीचा भाव आहे..
जोडता कर दोन्ही , पण आत अहं पणाचा प्रभाव आहे..!!
.
.
येई हात जोडूनी ,तरी आत रोज नवा डाव आहे..
बांधले हात माझे जरी,मला तुमच्या मनाचा ठाव आहे..!!
.
.
तरल मन माझे , त्यावर रोज नवा घाव आहे..
बदलून सारे मन,म्हणती मनस्वी तुझा स्वभाव आहे..!!
.
.
पाप-पुण्य वृथा सारे ,सारा माझाच बनाव आहे ..
मी देव आहे..मी देव आहे..हो मीच देव आहे.. !!
-विनायक
No comments:
Post a Comment