माझी कविता- मैफिलीतलीटाळ्यान्च्या अपेक्षेत
ठेक्यात चालणारी
अपेक्षानी काढलेल्या
रिन्गणातच फिरणारी !
माझी कविता- कागदावरची
प्रयोगान्च्या नव्या
वाटा धुन्डाळणारी
वाटांच्या जन्जाळात
स्वत;लाच हरवणारी !
माझी कविता- मनातली
मनाच्या तुरुंगातून
हळूच डोकावणारी
डोकावून परत
मनातच रहाणारी !
(अशोक)
आज फार थकलेय
जीव नकोसा झालाय
असा म्हणाल्यावर ती हळूच येते
थंड झुळूक घेवून
माझी कविता माझ्यासाठी
मस्त वाटतेय
आनंद झालाय
खुश आहे
असा म्हणल्यावर ती हळूच येते
दुख्खी कवडसा उलगडत
माझी कविता माझ्यासाठी
कोणी नाहीये माझ
खूप एकाकी एकटी
सगळे जणू पांगलेत
असा म्हणल्यावर ती हळूच येते
मी आहे ना असा म्हणत
माझी कविता माझ्यासाठी
ती जगते माझ्या साठी
मी जगते तिच्यासाठी
तिची खोलखोल
आशयगर्भ कुशी
माझ्या खुळ्या स्वप्नासाठी
माझी कविता माझ्यासाठी
-अनुजा(स्वप्नजा)
No comments:
Post a Comment