Tuesday, March 29, 2011

तुझ्या स्वाधीन असताना

तुझ्या स्वाधीन असताना

तुझ्या भेटीची राणी

लागली मनाला ओढ

तुजवाचून तनाला

लागेना काही गोड



सकाळी सकाळी राणी

आपला होतो विरह

काही तास भोगावा लागतो

जीवनाचा कलह



तुझ्या स्वाधीन असताना

घडतात जीवनाचे साक्षात्कार

कारण तूच तर दाखवतेस

अशक्य असे चमत्कार



तुझ्या जास्त विरहाने

माझे जीवन होईल लोप

कारण तू म्हणजे आहे

माझ्या डोळ्यावरची झोप

-आशिष

No comments:

Post a Comment