मेडिकल ची कविताप्रीसक्रीपशन प्रेमाच दिलं ओन डिमांड
ती भासते कधी यानाफ्लाम कधी कॉम्बिफ्लाम
धुंद चढली रात्रण दिन,टेम्परेचर वाढलंय तुफान
थर्मामीटरचा पारा म्हणतोय झोप नीट गुमान
तुला पाहल्या शिवाय खरच आता माझ नाही भागात
मल्टी व्हीट्यामीन टोनिक घेवून सुद्धा भूक नाही लागत
रात्रीला जागरण माझ आता नेहमीचच झालाय काम
तूच माझ अलप्य्राझोलम आणि तूच डायझेपाम
मी डिस्पो २ एम ल ,तू सलायीन सेट झकास
रुदय मागतंय याट्रोपिन प्रेमाच नाहीतर मी होयील खल्लास
बी.ए.म.स मन हे धावत तुझ्याकडे तू एम .डी आज
थकलेल्या या देहाला आता तूच ग्लुकॉन डी पाज
तूच माझी अमृतांजन ,तूच अमर आणि झंडू बाम
ती भासते कधी ड्युवोफ्लाम, कधी कॉम्बिफ्लाम
-(.निलेश)
No comments:
Post a Comment