सासू माझी.....(विडंबन)
भांडलीय सख्ख्या शेजा-यांशी
भांडलीय अख्ख्या चाळीशी
डोळ्यात पाणी येईस्तोवर भांडलीय...
आगडोंब होऊन भांडलीय...
एक कळशी पाण्यासाठी...
रक्ताचं पाणी होईस्तोवर भांडलीय...!!१!!
.
.
.
भांडलीय घर मालकाशी
भांडलीय ही मोलकरणीशी
घश्याला कोरड पडेस्तोवर भांडलीय...
चक्कर येवून पडेस्तोवर भांडलीय....
स्वत:चच खर करण्यासाठी...
मुक्ताफ़ळं उधळीत भांडलीय...!!२!!
.
.
.
भांडलीय आप्त-स्वकीयांशी
भांडलीय येणा-या-जाणा-यांशी
तीचं तिला मिळावं म्हणून भांडलीय...
दुस-यांचही तिलाचं मिळावं म्हणून भांडलीय...
स्वार्थ सिध्दीस नेण्यासाठी...
महामाया बनून भांडलीय....!!३!!
.
.
.
भांडेल तिच्याच सासू-सास-यांशी
भांडेल स्वत:च्या नव-याशी
मुलाला मुठीत ठेवण्यासाठी...
भांडेल कड-कड सुनेशी...
तिसरा कोणी पडता मधे...
खरडमपट्टी काढत भांडेल....!!४!!
.
.
.
मृत्य़ू उभा ठाकता समोर...त्याच्याशीही भांडेल...
"तू येशील ये....तू नेशीलच मेल्या...ने !!"
पण इतक भांडण नक्कीच करेल...
डोळ्यात डोळे घालून म्हणेल...
वा.के.खा...वा.के.खा....(गोठ्यात वासरू केरसुणी खातेय हो !)
जाता जाता यमदूताशीही भांडेल...!!५!!
.
.
.
पण खरं सांगू ???
संसार फ़ुलवा म्हणून भांडलीय
फ़ूलत रहावा म्हणून भांडलीय
कोंड्याचा-मांडा करुन भांडलीय...
शिमग्यलाही दिवाळी गणून भांडलीय....
घरा-दाराच्या सौख्यासाठी ..
काट्यातली फ़ूलं वेचत भांडलीय !!६!!
-सुप्रिया.
No comments:
Post a Comment