Monday, March 28, 2011

पाणी किती झाले देवा

पाणी किती झाले देवा

पाणी किती झाले देवा, बुडाले शहर

सगळेच रडतात, कसला कहर



माझ्या जिवाचा तुकडा, कुठे कोण जाणे

करतोस का रे खेळ, असे जीवघेणे

दया कर आणि थोडे चंद्राला आवर

सगळेच रडतात, कसला कहर



आई बाबा आई बाबा, आईच पाहिजे

काही काही नको; आई, पाशीच जायचे

नाव सांगेन तुमचे, आई आल्यावर

सगळेच रडतात कसला कहर



कसे जाऊ बाळापाशी राधे पाशी माझ्या

माझा जीव अडकला, सुनामीत तुझ्या

त्यांची माझी भेट व्हावी व्हावी लवकर

सगळेच रडतात कसला कहर



किती आया किती बाबा, मुले दूर झाली

दैव देते आणि घेते कधी कुण्या काली

धरतीच फाटली रे फाटले अंबर

सगळेच रडतात कसला कहर



-तुषार जोशी, नागपूर

२१ मार्च २०११, ००:३०

No comments:

Post a Comment