Monday, March 28, 2011

मैत्रिणीने म्हटले एक गोड बातमी आहे

मैत्रिणीने म्हटले एक गोड बातमी आहे

कालच पाहून गेले लग्न होणार आहे

मुलाची तर चौकशी मी केलीच नाही

विचारले तुझ्या सासूचे वय किती आहे ?



दोघे तुम्हीआहात working couple

ऑफिसला सकाळी सातला पळणार

थकून भागून रात्री उशिरा पोचणार

कोण घर ,धुणीभांडी मुलं संभाळणार ?



मुलाचा हुद्दा अन पगार फक्त बघ

नवरा ठेवता येईल नक्कीच मुठीत

खाष्ट वा गोड सासू पहावी धडधाकट

सुखी संसाराच हेच तर आहे गुपित !!





-oceanheal

No comments:

Post a Comment