Tuesday, March 29, 2011

ओळख ज्यांची ..महाराष्ट्र आणि माय मराठी

ओळख ज्यांची ..महाराष्ट्र आणि माय मराठी

शूर वीरांचे रक्त वाहले गेले राष्ट्रासाठी

ओळख ज्यांची .. महाराष्ट्र आणि माय मराठी

तडपत्या तलवारी आणिक स्वराज्य मनगटी

ओळख ज्यांची .. महाराष्ट्र आणि माय मराठी

शिरी फेटा, बुक्का अष्टगंध शोभते ललाटी

ओळख ज्यांची ..महाराष्ट्र आणि माय मराठी

लोककला लावणी,आणिक शोर्याचे पोवाडे गाती

ओळख ज्यांची ..महाराष्ट्र आणि माय मराठी

भाऊ बंदकी,मान वडीलधाऱ्या ,जोपासती नाती

ओळख ज्यांची ..महाराष्ट्र आणि माय मराठी

कांदा,ठेचा,बाजरी,ज्वारी...भाकरी पोटी

ओळख ज्यांची ...महाराष्ट्र आणि माय मराठी

रानमाळी गुरे चारती घेवून घोंगडी हाती काठी

ओळख ज्यांची ..महाराष्ट्र आणि माय मराठी

ठेच लागता आपो आप येई "आई गं" ओठी

ओळख ज्यांची ..महाराष्ट्र आणि माय मराठी

नादते सुख समृद्धी, यशा मध्ये नित होई भर भराटी

ओळख ज्यांची ...महाराष्ट्र आणि माय मराठी

-(निलेश )

No comments:

Post a Comment