तेव्हा तु हलकासा शिंक एकदा ..
कधी चिकटशा दुधाचा अभिषेक ,
कधी हळदी-कुंकवाची बोटं..
परसदारी उभे करुन..
तेला-मधाच्या बाटल्या उपड्या करतात लोक तुझ्यावर..
मळवट भरल्या बायका,
गातात जेव्हा तार स्वरात..
गालात दगडी स्मित ठेउन..
अन, दुसरा पाय मुडपुन..
उभा राहतोस..
एका पायावर भार ठेउन ,,
दगडाचा नसशील तर त्रास होत असेल नक्कीच..!!
धुनी देत असेल जेव्हा पुजारी,
तुपाच्या धारी टाकुन..
वेगवेगळ्या कसल्याशा धुरांचा..
तेव्हा तु हलकासा शिंक एकदा ..
तर विश्वास बसेल तु सारं बघतोयस याचा..!
-(अनुवादीत)
विनायक
अनुवाद:
इक जरा छींक ही दो तुम
गुलज़ार
No comments:
Post a Comment