फ़कीर
त्याचं क्षितिज त्याने आखून ठेवलं आहे
त्याला कसला भास् आणि त्रास का असावा
त्याने त्याच्या शांत मुद्रे खाली
सगलेच आभास पुरून टाकले आहेत कायमचे
विश्वाच्या उद्धाराच्या चिंतेने
तो स्वतःच इतका ग्रासून गेला की
सूर्य आणि चंद्राला ग्रहण देखिल
सोपे वाटू लागले
त्यानं स्वतःच आभाळ गोंदून घेतलं
स्वतःच्याच कापाळी आणि
तो निघालाय स्वतःच सूर्य बनून मावलायला
सारं आकाश त्याने भगव्या रंगाने रंगवून टाकलं
आणि त्या जगतनियंत्यालाच विरक्तिचा भास झाला
तो मानवतेचा जागर आहे
तो एक फ़कीर आहे
सारं जग हरवलं आहे आणि तो
हातामध्ये ह्रदय घेउन फिरतोय आणि म्हणतोय
..घ्या हो उधार घ्या ही माणुसकी आहें ...
..घ्या हो उधार घ्या ही माणुसकी आहें ...
- स्वरदा...
No comments:
Post a Comment