माझी सासू कडक आहे
बोलण्याला तडक आहे
नवीन साडी घातली की म्हणते
"कलर थोडा भडक आहे"
माझी सासू जाम आहे
ए.सी. मधला घाम आहे
लावल्यानंतर डोके दुखते
असा झंडू बाम आहे
माझी सासू सैंपल आहे
न हसता येणारं डिंपल आहे
चारचौघात लपावावे असं
गालावरचं पिंपल आहे
माझी सासू भांडेल आहे
आऊटडेटेड सैंडल आहे
भंगारातही घेत नाहीत असं
१९४७ चे मॉडेल आहे
हे सगळं सोडलं तर,
तशी माझी सासू गोड आहे !
कैरीची फोड आहे..
कितीही आंबट असली तरी
मना तिची ओढ आहे....
- राज (२३-०३-२०११)
No comments:
Post a Comment