Monday, March 28, 2011

तशी माझी सासू फ़ार गोड आहे !

तशी माझी सासू फ़ार गोड आहे !

.

.

.

'हे’ रत्न हिच्या पोटी कसं ?

.......एक मोठं कोडं आहे,

कारण ..........



तशी माझी सासू फ़ार गोड आहे !

.

.

.

ती शांत तर हा घुमा...

ती माउली थोर...घरादारा हा घोर...

तीच्या शांततेला विचारांची जोड आहे..



तशी माझी सासू फ़ार गोड आहे !

.

.

.

हिच हसणं.....सनईचे सूर...

ह्याच रुसण.....विझत्या निखा-यातला धूर...

तीच्या ह्र्दयात जरी माजलेलं काहूर आहे..



तरी माझी सासू फ़ार गोड आहे !

.

.

.

हिची होते सा-यांसाठी तड्फ़ड...

छोट्या छोट्या गोष्टीवरुन ह्याची कडकड...

तिच्याकडे मात्र या सा-याची नामी तोड आहे...



तशी माझी सासू फ़ार गोड आहे !





-सुप्रिया.

No comments:

Post a Comment