Saturday, March 26, 2011

देव ३

देव ३

आई , एक न देव सगळे ?

मग ते पुजायचे का वेगळे?



त्यामुळे मिळतो प्रसाद निराळा..

गणपतीचा मोदक तर कृष्णाचा गोपालकाला ..



बर मग गणपती तर एक न सारे?

मग वेगळ्या मांडवात का बिचारे?



काही पावतात नवसाला..

काही पितात दुधाला..



गणेशोत्सव का झाले सुरु?

विचार होता सगळे लोक एक करू..



माहित नाही बाळा नक्की कुठली एकी मांडतात..

देव एक सगळे खरच .. तरीही हे सगळे भांडतात..!!!



विचारू नको राजा गणित हे सगळे...

करून करून भागले..अन देव पूजेला लागले..





-विनायक...

No comments:

Post a Comment