सासू महामाया
हिडिंबेची काया
बकासूरी खाया
अव्वल ती||
सासू लई गुणी
'पट्टा' लोण्यावाणी
तिच्याविण सुनी
चाळ सारी||
सासू एके सासू
पाढा हा ना चुके
स्वामी त्रैलोक्याचा
शरण रे||
सासू कुंभकर्ण
ढोल-ताशे-अस्त्र
तिच्यापुढे शस्त्र
मान टाकी ||
म्हणून म्हणते.....
भक्ता हात जोड
सासू म्हण गोड
(विखावरी तोड)
रेणू म्हणे ||
-रेणुका (रेपाळ)खटावकर
२५/३/२०११
No comments:
Post a Comment