Wednesday, March 30, 2011

काँम्रेड......

काँम्रेड......

काँम्रेड,असे मूळीच नाही

तुला कशाचेच ज्ञान नाही

एवढे मात्र नक्की की,

तुला वास्तवाचे भान नाही.



परिवर्तनाचा साधा नियम

अजूनही तू पाळला नाहीस.

तुझी भूमिका रास्त असूनही

माणसात माणसाळला नाहीस.



तुमच्या अढळ निष्ठा पाहून

लोक म्हणतात,हे हेकट आहेत !

काँम्रेड, ढळू नकोस,चळू नकोस

तुझेही दिवस निकट आहेत !!



-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

Post a Comment