Wednesday, March 30, 2011

ती कितिकदा रडली होती माझ्याकड़े येउन

ती कितिकदा रडली होती माझ्याकड़े येउन

कितीतरी वेळ बसायची शुन्यात नजर लावून



म्हणायची खूप कंटाळले आहे आयुष्याला

किती काळ कोंडून ठेऊ आतल्या आत जिवाला



मी फार तर तिला कपभर दूध देऊन शांत केलं

चार प्रेमभरे शब्द बोलून तीच मन हलकं केलं



म्हणाली ताई उद्या धरनं कामाला न्हाय जमायचं

आमचा सांड लायी ध्वूतो आता म्हाज्यान न्हायी व्हायचं



मला तिचं नवा-या विषयीचं बोलणं ऐकून कसंतरीच झालं

सॉफेस्टीकेटेड मनाला हे असं बोलणं नव्हतं पटलं



काही दिवस ती आलीच नाही मला तिचे वेध लागले

काय झालं असेल तिचं मनात अनेक प्रश्न येऊ लागले



बातमी आली , ती मेली , धक्का बसला, कशी गेली?

आत्महत्या केली की नवा-याने मारली ???



तिचे शब्द आठवले , तिने तेच केल असणार

मी विचारलं की तीच प्रेत कुठे नेणार



मी धावले , तिच्या कड़े , सांगा तिला कुठे नेलं?

बेवारशी स्मशान भूमि .... उत्तर आलं .....

-स्वरदा...

No comments:

Post a Comment