किती गोड सासू
कुणाला मिळाली किती गोड सासू
कुणाला कळाली किती गोड सासू
मुलाला मुठीबद्ध ठेवायसाठी
तिच्या हालचाली किती गोड सासू
म्हणालास तू सर्व बागेत जाऊ
तरारा निघाली किती गोड सासू
घरी सांगतानाच दाटून आले
तशी ती म्हणाली किती गोड सासू
तुम्हाला म्हणायास हो काय जाते
स्तुती फार झाली किती गोड सासू
-तुषार जोशी, नागपूर
२४ मार्च २०११, ०७:३०
No comments:
Post a Comment