Monday, March 28, 2011

सासु सुन - एक बहुरंगी नातं

सासु सुन - एक बहुरंगी नातं



सासु सुन एक ज्वलंत प्रश्न

सुटता सुटत नाही

कारण प्रत्येकीला हेच वाटतं

मीच बरोबर बाई



सासु म्हणते दिला जन्म

आयुष्य घातले खर्ची

मुलासाठी केले कष्ट

तरी हीच माझ्या वरची



मुलासाठी काही करायचे

शिल्लक ठेवले नाही

शिक्षण कपडे हौसमौज

कशात कमी पडले नाही



सुन हसुन देते उत्तर

ह्यात नवल ते कसले

माझ्यासाठी माझ्या आईने

हेच सगळे केले



इतकी वर्ष मुलाचे करुन

समाधान नाही झाले

मग आपल्या या बाळाचे

लग्न कशाला केले



सासुच्या कष्टांबद्द्ल

मुळीच शंका नाही

सुनेचे म्हणणे सुद्धा

तितकेसे चुक नाही



सासु सुनांचे भांडण

नियतीताच खेळ सारा

पण ज्याच्यासाठी त्या भांड्तात

तो सदैव राह्तो नामानिराळा....



कवयित्री:- सौ सुलभा मठाधिकारी.

No comments:

Post a Comment