(चार ओळी ,,,,,,प्रथम )"डाव नियतीने आज एक मोडला
सांगावा जीवाचा जीवाला धाडला
कशी पाखरांची ताटातुट जाहली
धागा गुंफलेला क्षणात तोडला"
(आई).......
अनवाणी मन आजं हे... चाललं कुणी कडे
गळ आथरुनी हे... पाणीच पाणी चहू कडे
माझ्या इवलाश्या मोत्यांना.. मी शोधू कुठे
धनी माझा शिंपला... आज नाही माझ्याकडे
का निसर्गा कहर असा तू आज आणला
संसारा माझ्या फुटला बांध बांधला
पहाटेचे सुख सांजी विसावले
मोडून त्यास तू आज ना मानला
(मुलं)..........
रडू रडू आमचा जीव आता थकला ग
बाबा कुठ राहाला तू ,आई तू येणा ग
कसला कसला मुळी आम्ही हट्ट धरणार नाही
आम्हा नेण्यास आई तू बाबाला सांगणा ग
तू सांगशील तसच आई आम्ही वागू ग
चोक्कलेट्स,आईस्र्क्रीम सुद्धा नाही मागू ग
इवल्याश्या या डोळ्यांना भीती वाटते ग
लवकर येवून आई आम्हाला कुशीत घेणा ग
(बाबा )
कुणा सांगू आर्त हि कसा फोडू टाहो
कुणी सुखरूप ते असण्याचा निरोप द्याहो
कोलमडून पडले सारे डोळ्यादेखत
साद घातलेले शब्द तिथवर पोहचवा हो
कशी असतील माझी चिमणी पाखरे
कुठे असेल माझी सखी देवा सांगरे
पाणी डोळ्यातही आता साचले
मदतीला अमुच्या तूच धावरे
-.(निलेश)
No comments:
Post a Comment