सासूचे गाऱ्हाणे
माझे सासर सासर सासू असे मोक्यावर
किती मारून मनाला रोज बनावे चाकर
जरा कौतुकाचे तिचे कधी नसे गं बोलणे
किती वागावे चांगले तरी मागून टोमणे ....
गोत माहेरचे सारे तिच्या दिमतीला येती
किती करू मागे पुढे शिव्या शाप मला देती
लेक गुणाचा सांगते सार्या शेजारा पाजारा
किती सरळ चालावे नसे मला कुठे थारा
केला उभा हा संसार असे हिमतीने बोले
किती केले जरी आंम्ही खालीवर पुंन्हा तोले
नका नका ग सयानो लावू नका जीव कुणी
किती आपले मानले , सून घरची पाहुणी
माझे सासर सासर ऐका सासूचे गाऱ्हाणे
किती सूरात मी गाते का वाटावे रड गाणे
-मनिषा (माऊ )
दि .२४.०३.२०११
No comments:
Post a Comment