आजच्या सासू ची व्यथा..
स्वप्नात पाहिले मी
कजाग सासु जाहले मी
नेसली भारी साडी रेशमी
चालते अशी झोकात मी
सूनेस हुकुम देत आहे..
ना आंगण,ना वृंदावनही
ना कुंडीत तुळशीचे रोपही
कोनाड्यात देव दिसतही नाही
’तुझ्यावर संस्कार नाही’
सूनेसच दुत्कारत आहे..
झाला गजर जोरात
न ऊठले,राहिले घोरत
दारावर थाप जोरात
’अहो आई’,हाक कानात
पदर खोचुन ऊठत आहे..
आज ऊशीर भारी झाला
काय करणार आज डब्याला
चहा पण नाहिच का केला
दुपार आहे न झोपा काढायला
सूनेचा पारा चढतो आहे..!
घर माझे जरी आहे
येथे सूनेचे राज्य आहे
मी त्यांची दासी आहे
तरी,जगाचे म्हणणे आहे
सासुच कजाग असते..!:(
-रजनी अरणकल्ले..२४.३.११
No comments:
Post a Comment