सगळ्यांना सुचतात कविता
एकमेकाचा वाचून कविता
तसे(प्रत्येक) एकट्यानेच लिहतो
आपण आपली कविता
.
कुणाला वाटते कधी
रात्र काळी होवून उठते
अश्या रात्री कुणाच्या मनी
एक एक चांदणी फुटते
.
वेडेपणाची सारी वेडे
इथ साऱ्यांना वेडवतात
मन होते दर्यासागर
हे मोकाट ताफे चालवतात
.
खवळलेला समुद्र तर
मन कधी यांचे शांत
गर्तेपेक्षा खोलच खोल
यांचा मनाचा नसतो अंत
.
बारा ही महिने असतात
ऋतू यांचे फुललेले
दिवसा खेळ चालतातच
रात्री ही झोपाळे झूललेले
.
वसंतात पानगळ यांची
वैशाखात पालवी नवी
म्हणूनची कि काय म्हणतात बुवा....
"जे न देखे रवी ते ते देखे कवी"
मनोज.....१९/२/२०११
No comments:
Post a Comment