पायदळी स्वप्ने सारी तुडवून गेला
नियतीच्या तांडवाचा कहर आज झाला
सागराच्या लाटेवरुनी यमदूत आला. ॥धृ॥
अशी कशी अचानक काळरात्र झाली
सुखी संसारात माझ्या दु:ख लाट आली. ॥१॥
शोधू कुठे बाळ माझा, कुणीकडे जाऊ
जीव झाला वेडापिसा, कशी शांत होऊ. ॥२॥
साजणाच्या खुशालीचा मनामधे धाक
ऐकण्यास आसूसले प्रेमभरी हाक. ॥३॥
डोळ्यातल्या सुनामीला बांध कसा घालू?
अंधारल्या आयुष्याची वाट कशी चालू? ॥४॥
देवही असा कसा निष्ठूर आज झाला
पायदळी स्वप्ने सारी तुडवून गेला. ॥५॥
- संजीत. २२-३-२०११
No comments:
Post a Comment