तू चराचरात आहेस
मी विश्वास ठेवते यावर
मी विचारल की दिसशील का?
तू काहीच बोलत नाहीस त्यावर ...
अन्तरंग म्हणजे तूच
असं तत्ववेत्ते सांगतात
मग पापी मनांच काय?
अस मी नाही अनेक बोलतात ...
तू जाब विचारला
तरी उत्तरत नाहीस
कधीच कोणाशीच
काहीच बोलत नाहीस
तू शरमेने काला ठिक्कर
पडला आहेस का?
ही दुनिया तूच बनवलीस
आता हतबुद्ध झाला आहेस का?
छे रे सोड या गोष्टी
आता तर तुझ अस्तित्वच मानत नाहीत
देव कोण तो काय बिघडवेल
अस म्हणून शर्मिंदाही होत नाहीत
देव माझ्या बोलण्यावर फ़क्त हसला
तेव्हा मला अर्थ समजला नाही
त्याच्या हास्याने आक्खा समुद्र हिन्दोलला
आणि माणूस त्यासमोर कुठचा राहिला नाही
- स्वरदा
No comments:
Post a Comment