कविता माझी.
रित्या मनाची कफ्फलक आरोळी
मोडक्या तोडक्या शब्दांची होळी
खोट्या खर्या भावनांची रांगोळी
अशीच असते कविता माझी.
मनातल्या कोषाताला अंधार ओकून
स्वतःचा दोष नियतीवर लादून
ओढून ताणून यमक साधून
उभी राहते कविता माझी.
स्वप्नांच्या रानी स्वैर भटकून
गतकाळातील क्षणांवर उफराटे लटकुन
आपल्याच अस्तित्वाला जराशी दचकुन
श्वास घेते कविता माझी.
- शशांक प्रतापवार
No comments:
Post a Comment