जीवेम शरद:शतम
या सृष्टीचे वैभव माझ्या, डोळ्यांनी मी बघावे
मज वाटे मी या जन्मी, शंभर शरद जगावे
हिरव्या अजुनही दिशा दाही
भरल्या सुगीची देती ग्वाही
या सुंदर सुबत्तेसाठी, मी शत जन्म त्यागावे
मज वाटे मी या जन्मी, शंभर शरद जगावे
मोर अजुन दावी पदलालीत्य
पाखरांचे अजुनाही हवेत चित्त
चराचरांनी सृष्टीचे हे, सौंदर्य असे भोगावे
मज वाटे मी या जन्मी, शंभर शरद जगावे
हवेत असतो मंद गारवा
आनंदाने घुमतो पारवा
नदी अन नाले, झुळझूळत्या पाण्याने ओघावे
मज वाटे मी या जन्मी, शंभर शरद जगावे
शरदाच्या चांदण्याची गोडी
मी चाखावी थोडी थोडी
देवाने जर देता मज वर, हेच दान मागावे
मज वाटे मी या जन्मी, शंभर शरद जगावे
-हरीश दांगट
March 19, 2011
No comments:
Post a Comment