Monday, March 28, 2011

तो माझा वाडा होता..

तो माझा वाडा होता...

तो माझा वाडा होता अन ती वाड्याची खिडकी

अजून जपली हृदयी, होती जरी इमारत गळकी



गुणी मुलांनी आपआपले वाटे करून नेले

उरले आई-बाबा, ...विटकी पिशवी, ...वस्त्रे मळकी



वस्त्रें चमचमती, लखलखते महाल, गाड्या भारी

जगणे राजस, खाणे ताजे; ...तरी मने का कुजकी?



पहा, जगाची रीत अशी, ना कुणी कुणाचा वाली

कुणी नाहते मद्याने तर कुणास नसते 'दिडकी'



असते अशी नोकरी, ललना, कीर्ती, सत्ता, प्रतिभा

पहा, पहा आलीच... म्हणेतो निघते घेउन गिरकी



जरी दूरच्या देशांमध्ये नाती जोडुन आलो

तरी आपल्या शेजारी का नजर राहते तिरकी ?

No comments:

Post a Comment