Tuesday, March 29, 2011

जातीसूत्र

जातीसूत्र

जात जन्माला येत नाही

जात जन्मानंतर रूजवली जाते.

जात जातीय खुणांनी

छान सजवली-धजवली जाते.



जात गेल्यासारखी वाटते.

पण जात काही जात नाही.

जात म्हणजे असाध्य रोग

उपाय काही ज्ञात नाही.



जात जाईल कशी ?

जात जातीने पाळली जाते.

जात जातीला भेटताच

जात जातीवर भाळली जाते.



जातीच्या मूळाशी

जाती-जातीचे गोत्र असते !

’ रूजवा आणि माजवा ’

हे जाती-जातीचे सूत्र असते !!



-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

Post a Comment