Monday, March 28, 2011

माझी सासु थोर आहे



माझी सासु थोर आहे 

जीवाला माझ्या घोर आहे



रूपाने आहे चिकणी

हातात शोभे लाटणी

चमचम चमकणारी

चंद्राची कोर आहे



ढगांचा रोज गडगडाट

घरात चाले थयथयाट

मागे पुढे इथे तिथे

नाचणारा मोर आहे



पालथा घातलेला घडा

रोज नवा वाचावा धडा

तिखट मीठ लावलेलं

आंबटगोड बोर आहे



शेजार्यांच्या डोक्याचा ताप

सासर्यांच्या छातीची धाप

कमी न होणारा असा

अंगातला जोर आहे



काय पण? गोड आवाज

अलग मद मस्त अंदाज

गळ्याभोवती आवळलेला

फाशीचा दोर आहे



-मनिषा (माऊ )

दि .२४.०३.२०११

No comments:

Post a Comment