Monday, March 28, 2011

सून आळविते

सून आळविते 



सून आळविते , बसावी निवांत

सासू व्हावी शांत ,पांडुरंगा ||



तशी माझी सासू ,आहे खूप गोड

तीला नाही तोड, त्रिभुवनी ||



तिचे रंग न्यांरे, कुणाला कळेना

सूर हे जुळेना , संसाराचे ||



कसेही कुठेही , काहीही बोलावे

बेताल वागावे , नाही भीती ||



नसे तीला भान .घालते आरोळी

कधी ही अवेळी , रात्र दिनी ||



कोणाच्याही पुढे, सांगेल गाऱ्हाणे

सदा रड गाणे , ओठावरी ||



येणारे जाणारे , परकेच गोड

सून असे व्दाड ,तिच्या साठी ||



मिळे अशी सासू, सोडेना ही पाठ

बांधलेली गाठ ,जन्म भरी ||



घालीन लोटांगण ,धरेन चरण

जरीहे मरण, रोज वाटे ||





-मनिषा (माऊ )

दि .२५.०३.२०११

No comments:

Post a Comment