Monday, March 28, 2011

माझे जग माझ्या उराशी मी जपले

माझे जग माझ्या उराशी मी जपले 

इवले घरटे माझे तुझ्या कृपेने सजले

असा काय कोप तुझा जीवघेणा व्हावा

बुडवून सारे जग तुझा काय तोष व्हावा....

देवा SSSSSSS तुझा काय तोष व्हावा .....



जीव माझा इवलासा दूरावून कुठे ????

प्राण माझा अडकला त्याना शोधावे मी कसे

लाटांवर लाटा धाडी सागर, शांत कसा व्हावा

बुडवून सारे जग तुझा काय तोष व्हावा....

देवा SSSSSSS तुझा काय तोष व्हावा .....



तुझा काय कोप झाला माझे काय पाप झाले

माय मी तान्हुल्याची काकूळती झाले

माझा धनि कुठे कसा सूखरूप असू द्यावा

बुडवून सारे जग तुझा काय तोष व्हावा....

देवा SSSSSSS तुझा काय तोष व्हावा .....

- स्वरदा ...

No comments:

Post a Comment