नको रे झटकून टाकू ते पाणी
संजीवन आहे ते
तुझ्या डोळ्यातलं पाणी,
म्हणजे साक्षात पाझरणारं प्रेम
तेच तर आहे माझ्या हिरवाईचं रहस्य
तुझ्यातल्या जीवनाची खूण
ते दोनच थेंब...
त्यावर माझी आख्खी सावली ओवाळून टाकेन की रे
माझ्या सावलीहून मोठा
एखादा आडोसा आहे?
कोसळलेली फांदी
तू आधार दिलेल्या बुंध्याहून मोठी नाही,
हे जाणते मी.
आणि म्हणूनच
नको असहाय होऊस.
दोघे मिळून सामोरे जाऊ या
भकास आकाशाच्या
हिरव्या स्वप्नाला
-आसावरी
No comments:
Post a Comment