जगताना मरणाचे, जोपासले छंद मी
जगताना मरणाचे, जोपासले छंद मी
चौकटीत जगण्याला, केलेही बंद मी
आकाशाने कधी मला, ना कवेत घेतले
नाकारे जमीनही, तो विकारी कंद मी
प्रत्येक युक्तिवादही, नेतात ते हसण्यावरी
या शहाण्यांच्या जगी, ठरलो सदाच मंद मी
लाख दुःख्खे सोसूनी, जो दिसे चेह-यावरी
डोळ्यातूनी ओसंडणारा, तो मुका आनंद मी
सादगी पाही कुणी? या बंदगीची बात सोडा
जिंदगीने शापिलेला, गंदगीचा गंध मी
- राज (२२-०३-२०११)
No comments:
Post a Comment