Saturday, March 26, 2011

कुणाला बोललो नाही पण

कुणाला बोललो नाही पण आज काल मला बरंच वाटत नाहीये

कुणाला बोललो नाही

पण आज काल मला

बरंच वाटत नाहीये

धड बसवत नाही

धड झोप लागत नाही

धड काही सुचत नाही

धड काही लिहिता ही येत नाहीये

कुणाला बोललो नाही

पण आज काल मला

बरंच वाटत नाहीये

दौतीन साथ सोडल्यावर

लेखणी कसे आचके देते पाहिलेत ?

तसंच काही तरी होतंय

आता आपण तडफडून - तडफडून मरणार

अस रोज रात्री

माझ्यातल्या कवीला वाटतंय

खर तर त्यालाच जगायची इच्छा उरली नाहीये

कुणाला बोललो नाही

पण आज काल मला

बरंच वाटत नाहीये

Psychiatrist म्हणतो

"हे तुमचे भास आहेत

कवी वगैरे कोणी नाहीये "

खरच मला भास होतायत

का मला वेड लागलंय?

छे

माझं मलाच काही काळात नाहीये

कुणाला बोललो नाही

पण आज काल मला

बरंचवाटत नाहीये

परवाच मला घरच्यांनी ADMIT केलाय

तेव्हा पासून कालपर्यंत

अखंड TESTS देतोय

आणि आज सकाळी

आलेल्या REPORT आवाज

अजून माझ्या कानात घुमतोय

" He is suffering from severe

DE-ALCOHOLATION

Lack of alcohol in blood "



आता मला घरच्यांशी नजर मिळवायची हिम्मत होत नाहीये



कुणाला बोललो नाही

पण आज काल मला

बरंच वाटत नाहीये



अभिषेक मु. प्रभुदेसाई

No comments:

Post a Comment