थोडंसं मराठी
Saturday, September 3, 2011
Thursday, September 1, 2011
Wednesday, March 30, 2011
त्यांच्या डोळ्यात पाणी
ती आपल्या मुलीला देणार चोरून गोड़ दही
मला मात्र ताटात वाढणार शिळ-पाकं काही-बाही
भरजरी साडी आणेल आपल्या मुलीला ...आणि
मला म्हणेल ए बाई तुझ्याकडे फार साड्या झाल्या
मुलीचा वाढदिवस जोरदार साजरा केला आणि
मला म्हणाल्या अग्गोबाई तुझा b'day विसरून गेला
एक दिवस आजारी पडले अगदी कोमेजून गेले
त्यांच्या डोळ्यात पाणी, थांब हं औषध घेउन आले
- स्वरदा...
ती
ती - बाई होती
मी - आई होते
ती - दाई होती
मी - माई होते
ती - कष्ट करणार
मी - निवांत बसणार
ती - जाऊ का विचारणार
मी - काम सांगणार
ती - पगार मागणार
मी - चुका सांगणार
ती - काकूळती होणार
मी - फ़क्त ऑर्डर करणार
ती - मुलांना जीव लावणार
मी - मुलांना ओरडणार
ती - जाउदेत ताई
मी - त्यांची आहे आई
ती - सहन करते
मी - डाफरते
ती - दाई आहे
मी - आई आहे
- स्वरदा
ती दारात उभी होती
ती दारात उभी होती
दाट केस, रंगीत साडी
भडक मेक-अप
वेगळाच अंदाज दुनियेकडे बघण्याचा
कसला हिशोब होता हे असं वागण्याचा???
नजर भेदक
निरळीच अदाकारी
आकर्शक हालचाल
काय करत होती ती?कशासाठी?
अन्न मागणा-या निर्दय पोटासाठी ...
अन्न मागणा-या निर्दय पोटासाठी ...
-स्वरदा...
दोष
दोष
तुझा दोष नाही तू माझा बाळ
नसे सकल जना
जाणीव ही
तुझी हेटाळणी, माझे पाप कर्म
जाणून होती जखमा
माझ्या चित्ती ..ll
दिस माझा वैरी अन् रात्र ही वै-याची
माझ्याच देहाची
मी कैदी ..ll
काय करावे, सांग माझ्या बाला
आई होण्या मला
लाज वाटे ..ll
बाला तुझा दोष नाही, मीच पापी आहे
माझ्याच भोगांचे कोड़े
मलाच सुटेना ..ll
- स्वरदा...
फ़कीर
फ़कीर
त्याचं क्षितिज त्याने आखून ठेवलं आहे
त्याला कसला भास् आणि त्रास का असावा
त्याने त्याच्या शांत मुद्रे खाली
सगलेच आभास पुरून टाकले आहेत कायमचे
विश्वाच्या उद्धाराच्या चिंतेने
तो स्वतःच इतका ग्रासून गेला की
सूर्य आणि चंद्राला ग्रहण देखिल
सोपे वाटू लागले
त्यानं स्वतःच आभाळ गोंदून घेतलं
स्वतःच्याच कापाळी आणि
तो निघालाय स्वतःच सूर्य बनून मावलायला
सारं आकाश त्याने भगव्या रंगाने रंगवून टाकलं
आणि त्या जगतनियंत्यालाच विरक्तिचा भास झाला
तो मानवतेचा जागर आहे
तो एक फ़कीर आहे
सारं जग हरवलं आहे आणि तो
हातामध्ये ह्रदय घेउन फिरतोय आणि म्हणतोय
..घ्या हो उधार घ्या ही माणुसकी आहें ...
..घ्या हो उधार घ्या ही माणुसकी आहें ...
- स्वरदा...
Subscribe to:
Posts (Atom)